Sunday, March 22, 2009

जगावं कधीतरी असही

जगावं कधीतरी असही ...
विसरून सारी दुःख
ऐकाव कधीतरी मनाचही ...
रोज रोजच्या कामाचा येतो
कधीकधी कंटाळा फार ...
मग घेउन जाव त्या मनालाही कधीतरी
वास्तवाच्या दुनियेच्या पार ...
काढाव तिकीट कधीतरी
कुठे जाणार आहे हे माहित
नसलेल्या बसच ...
देऊन पहाव स्मित हास्य
आपल्या ओठावरच कधीतरी
रस्त्यावरच्या भिकारयाला ...
आणि अनुभवाव त्याच्याही
चेहर्यावरच ते आश्चर्यबिंब ...
द्यावा कधीतरी Mc'D मधला burger घेउन
एखाद्या रस्त्यावरच्या मुलाला ..
आणि फिरवावा कधीतरी मायेचा हात
त्याही मुलांच्या डोक्यावर ..
बघा कधीतरी अस जगुन ..
वेगळ... आपल्या रोजच्या जिवनापेक्षा ...

3 comments:

megz said...

Worth giving a try to ur thoughts....

supriya hindlekar said...

mastt....

Chetana .....the ultimate inspiration said...

mazyakade shabdach nahi urleyet re bolayala..khoop khoop chan ghodya......khoop chan :)

Post a Comment