पडतात सुर्याची किरणे तुझ्या नाजुक डोळयांवर अणि पसरते लालसर सोनेरी छटा या अभाळावर...
पडतात सुर्याची किरणे तुझ्या बोलक्या पापण्यांवर आणि उमलतात असंख्य कळ्या मोठ मोठाल्या बागांवर...
पडतात सुर्याची किरणे तुझ्या पकलिसाराख्या ओठांवर आणि उमटते हास्य सर्व फुलांच्या चेहरयावर...
पडतात सुर्याची किरणे तुझ्या गोबरया गालांवर आणि बागडु लागतात फूलपाखरे हवेवर...
अर्थातच.......
पडतात सुर्याची किरणे जेव्हा तुझ्या चेहरयावर.....
उजाडतो एक नवा दिवस या भुतलावर...
3 weeks ago


0 comments:
Post a Comment